ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरातील धक्कादायक घटना महिलेची घरात घुसून हत्या

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव परिसरात एका अपंग महिलेची अज्ञात व्यक्तीने घरात घुसून क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धारदार शस्त्राने गळा व हनुवटीवर गंभीर वार करून महिलेला संपविण्यात आले असून, या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.​बोल्हेगाव येथील शनी मंदिरा जवळील कौस्तुभ कॉलनी, भारत बेकरी रोड परिसरात तक्रारदार (फिर्यादी) हे आपली पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत.

त्यांचे एमआयडीसीमध्ये वर्कशॉप असून, घटनेच्या दिवशी फिर्यादी व त्यांचा मुलगा नाशिक जिल्ह्यातील एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले होते. त्यांची पत्नी उंचीने बुटटी असून, दोन्ही पायांनी अपंग असल्यामुळे त्या सहसा घराबाहेर जात नसत.

​सकाळी चहा पिऊन फिर्यादी पिता-पुत्र सकाळी ६:४५ वाजता मोटारसायकलवरून बाहेर पडले. बाहेरगावी गेल्यानंतर फिर्यादींनी सायंकाळी ६:३० वाजता पत्नीला फोन केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. वारंवार प्रयत्न करूनही फोन न उचलल्याने त्यांनी शेजाऱ्यांना घरी जाऊन पाहण्याची विनंती केली.

​शेजाऱ्यांनी घरात पाहिले असता, संबंधित महिला हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्थितीत आढळून आल्या. ही माहिती मिळताच, कुटुंबीय तातडीने घरी परतले.

रात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास ते बोल्हेगाव येथील घरी पोहचले. घरात पाहणी केली असता फरशीवर रक्ताचे थारोळे, तसेच एक चाकू आणि ब्लेडपान दिसून आले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे