ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात विद्यार्थिनींचा पाठलाग करणार्‍या तरूणाला पकडले, गुन्हा दाखल

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा आणि तिच्या मैत्रिणींचा पाठलाग करणार्‍या एका तरूणास स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले आहे. संतप्त नागरिकांनी तरूणाला जाब विचारला असता त्याने त्यांच्यासोबत झटापट करण्याचा प्रयत्न केला.

दीपक बाळु वायभासे (रा. चिंचेवाडी, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. भिंगार, अहिल्यानगर) असे त्याचे नाव असून त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित 15 वर्षीय विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आपल्या दोन मैत्रिणींसह शनिवारी (13 डिसेंबर) दुपारी शाळा सुटल्यावर रिक्षाची वाट पाहत शाळेजवळ थांबल्या होत्या.

याचवेळी तरूणाने त्यांच्याकडे पाहून त्यांना जवळ बोलावण्याचे अश्लिल इशारे केले. या मुलींनी दुर्लक्ष करून बाजूला थांबल्यानंतर रिक्षाचालक आले आणि त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. मात्र, तोच तरूण त्यांच्या रिक्षाचा पाठलाग करत घराजवळ पोहोचला.

रिक्षाचालक यांनी त्याला जाब विचारला असता, त्याने उलट त्यांनाच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरातील महिला आणि अन्य नागरिकांनी एकत्र येत तरूणास घेराव घातला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरूणास ताब्यात घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे