ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

नगर मध्ये महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला..

अहिल्यानगर

नगरमध्ये महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. गाणे, डान्स, भावगीते, गप्पा टप्पा, एकमेकांची आपुलकीने विचारपूस, हृदयसंवाद अशा उत्साही वातावरणात सर्वांनी स्नेह मेळाव्याचा आनंद लुटला. कार्यक्रमास सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी डी.एम. बोरुडे, अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, अप्पर जिल्हाधिकारी सुधीर रक्ताटे, उपजिल्हाधिकारी पांडुरंग गायकवाड यांच्यासह तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडलाधिकारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते.

प्रथम सत्रात प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच दिवंगत नातेवाईकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर देवदत्त पाऊलबुद्धे यांचा करा ओके वर गाण्याचा कार्यक्रम झाला. प्रत्येक गाण्याचा उपस्थितांनी मनमुराद आनंद घेत दाद दिली. दुपारच्या सत्रात भोजनानंतर कर्मचाऱ्यांचा डान्स, भावगीते गायन, विनोदाचा कार्यक्रम झाला. सर्वांनीच या कलाविष्कार यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाची नियोजन व्यवस्था सर्वोत्तम क्षिरसागर, मरकड, कुलकर्णी मॅडम, मंजुषा सावदेकर आदींनी पाहिली. कार्यक्रमांची सांगता पसायदानाने झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे