आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
बीपी, शुगर वाढल्यास नि:शुल्क औषध, शासकीय रुग्णालयातील ओपीडीत रुग्णांची संख्या वाढली
अमरावती

बदललेली जीवनशैली, खानपान तसेच व्यायामाच्या अभावामुळे वरिष्ठांसह युवकांमध्येही उच्च रक्तदाब (बीपी) व मधुमेहाचे (शुगर) प्रमाण वाढले आहे. हे दोन्ही आजार असलेल्या रुग्णांना नियमित औषध घ्यावे लागते.
बाहेरून खरेदी केल्यास खर्चही जास्त येतो. ते पाहता जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात या आजाराचा औषधी मोफत मिळत असल्याने गरीब रुग्णांना दिलासा मिळाला असून ती घेण्यासाठी गर्दी वाढली आहे.