ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

फोर्ब्स मार्शल समूहाचे संस्थापक दरायस फोर्ब्स यांचे 97 व्या वर्षी निधन

पुणे

फोर्ब्स मार्शल समूहाचे संस्थापक दरायस एम. फोर्ब्स यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. फोर्ब्स यांच्या मागे फरहाद आणि नौशाद ही दोन मुले आहेत.

फोर्ब्स यांचा जन्म 1926 मध्ये झाला. त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी जे.एन.मार्शल या कंपनीत काम सुरू केले. तिथून त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करीत ब्रिटीश कंपन्यांशी भागीदारी केली. त्यांनी नंतर पुण्यात स्वत:चा कारखाना सुरू केला. त्यानंतर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार उत्तरोत्तर वाढत गेला. सेंटर फॉर अ‌ॅडव्हान्समेंट ऑफ फिलॉन्थॉफ्री (सीएपी) या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.

फोर्ब्स यांनी सेंटर फॉर अ‌ॅडव्हान्समेंट ऑफ फिलॉन्थॉफ्री या संस्थेच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली. फोर्ब्स यांना श्रद्धांजली वाहताना नोशिर एम. दादरावाला म्हणाले की, फोर्ब्स यांनी या संस्थेला आकार दिला.

याचबरोबर त्यांनी मुंबईतील त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात संस्थेला जागा दिली. ते अतिशय विचारी आणि इतरांना प्रोत्साहन देणारे व्यक्ती होते. त्यांना सामाजिक दायित्वाबद्दल चर्चा करण्यापेक्षा ते कृतीतून दाखविण्यावर भर दिला. त्यांचे अनुकरण इतर कंपन्यांनीही केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे