ब्रेकिंगमहाराष्ट्र
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन होणार

महाराष्ट्रात १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. कोकण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात १५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार आहे. मान्सूनच्या नवीन पद्धतीनुसार राज्यात कमी वेळेत अधिक पावसाच्या सरी बरसणार आहेत; असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.