ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बनावट कागदपत्र देऊन पॅथॉलॉजी लॅब सुरु

मुंबई प्रतिनिधी

शिक्षण आणि नागरिकांच्या आरोग्या संदर्भातील खळजबळजनक बातमी उघडकीस आली आहे. बनावट मार्कशीट आणि सर्टिफिकेट बनविण्याचे लोण आता मुक्त विद्यापीठापर्यंत येऊन पोहोचले आहे. बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब सुरू करून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार मुक्त विद्यापीठाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.

राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी 4 एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर या प्रकरणात आता 20 विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे.

कुठल्याही मोठ्या आजाराचे निदान करायचे असल्यास पॅथॉलॉजी लॅबमधून विविध चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टराकडून दिला जातो. आपणही डोळे झाकून संबंधित लॅबकडे जाऊन चाचण्या करून घेतो. ह्या पॅथॉलॉजी लॅब पात्रताधारक तंत्रज्ञांकडून चालवली जाते की नाही, याचा विचार कोणी करत नाही. मात्र, आता हा विचार करण्याची वेळ आली आहे. पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश पॅरामेडिकल कॉन्सिल आणि मुक्त विद्यापीठाने केला आहे.

बनावट कागदपत्राद्वारे पॅथॉलॉजी लॅब

सन 2020-21 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत यवतमाळ, ठाणे, जळगाव, अहमदनगर, मनमाड अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या 20 विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे बीएससी एमएलटी आणि डीएमएलटी या पदव्यांचे मुक्त विद्यापिठाच्या नावाचे बनावट मार्कशीट, सर्टिफीकेट तयार केले होते. लॅब सुरु करण्याची मान्यता घेण्यासाठी पॅरामेडिकल काउन्सिलकडे अर्ज करण्यात आला होता.

राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड

संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी काउन्सिलने मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे विचारणा केली असता असे विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतं नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले. यानंतर विद्यापीठाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून चौकशी केली असता विद्यापीठाचे बनावट सही, शिक्के याच्या माध्यमातून बनावट गुणपत्रक, प्रमाणपत्र तयार केल्याचं निदर्शनास आला आहे.

20 विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस

चौकशी समितीने 20 विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस पाठवून बनावट कागदपत्रे कोणाकडून घेतली याबाबत चौकशी सुरु केली असता साधारण 14 जणांच्या चौकशीत काही नाव समोर आली आहेत. त्यापैकी नागपूरचा गौरव शिरसकर, सातारचा रमेश होनामोरे, अहमदनगरचा अशोक सोनवणे आणि नांदगावचा संजय नायर यांची नाव समोर आली. तर नाशिक तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सशयितांच्या तपासासाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना होणार आहे.

आता प्रमाणपत्र तयार करताना विशेष खबरदारी

पॅरा वैद्यकीय परिषद आणि मुक्तविद्यापीठाच्या सतर्कतेमुळे एक गुन्हा उघडकीस आला आहे. आता प्रमाणपत्र तयार करताना विशेष खबरदारी घेतली जात असून क्यू आर कोड, बार कोडसह 15 वेगवेगळे सुरक्षाचे मापदंड नवीन प्रमाणपत्राना देण्यात आले आहेत. त्यामुळे खोटे दाखले प्रमाणपत्र तत्काळ उघडकीस येतील.

मात्र इतरही विद्यापीठातून अशा स्वरुपाचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले असतील तर त्याचा तपास व्हावा या उद्देशाने गुन्हा दाखल करण्यात आले. त्यामुळे तपासात काय निष्पन्न होते हे येत्या काळात स्पष्ट होईल.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे