ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

रनर्स अकॅडमीचा चालक जावेद शेख निघाला नराधम

अहिल्यानगर- विद्यार्थीनीवर शारीरिक अत्याचार, गुन्हा दाखल

स्ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी जवळीक साधून, तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी येथील रनर्स अकॅडमीचा चालक जावेद शेख (हल्ली रा. जकातेनगर, श्रीगोंदे) याच्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. ती नोव्हेंबर २०२४ पासून रनर्स अकॅडमीमध्ये सरावासाठी जात होती. एके दिवशी पीडितेने आपला पाय लचकल्याचे प्रशिक्षक जावेद शेख यास सांगितले. त्यावेळी त्याने तिला दुसऱ्या दिवशी पहाटे मैदानावर बोलविले. त्यावेळी स्ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने तो पीडितेला स्पर्श करू लागला.

तिने विरोध करूनही त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. सदरबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

जानेवारी २०२५ मध्ये पीडितेचे पोट दुखू लागल्याने ती शहरातील ग्रामीण रुग्णालयात गेली. तिथे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

तिने ही बाब जावेद शेख याला सांगितली. त्यावेळी आरोपीने त्याच्या एका साथीदारासह पीडितेच्या खोलीजवळ जाऊन तिला गोळ्या दिल्या. त्या गोळ्या खाल्ल्याने तिचा गर्भपात झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे