ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

चांगल्या सवयी लहानपणापासून रुजल्या पाहिजे. यश मिळविण्यासाठी सातत्य खूप महत्वाचे..

अहिल्यानगर

पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच प्राचार्य बत्तीन पोट्ट्याना प्राथमिक विद्यालयचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक 02/02/2026 उत्साहात पडले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कौशल्य विकास केंद्र अहिल्यानगर चे सहाय्यक आयुक्त श्री रविकुमार पंतम साहेब उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी सातत्य आवश्यक असते, अंगी चांगल्या सवयी असल्या पाहिजे आणि ह्या चांगल्या सवयी आपण लहानपणापासूनच आपल्या अंगी रुजविल्या पाहिजेत.जीवनात शिस्त पाहिजे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भारतीय जनसंसद चे श्री अशोक रमेश सब्बन यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला पाहिजे.

दररोज किमान एक तास व्यायाम केला पाहिजे. मोबाईलचा अतिवापर टाळावा. या कार्यक्रमासाठी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री शंकर सामलेटी साहेब , सहसचिव सौ सविता कोटा व ज्येष्ठ विश्वस्त तथा माजी प्राचार्य श्री सिद्धम सर विश्वस्त श्री राजूशेठ म्याना, श्री विजय सामलेटी साहेब उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली . त्यास विद्यालयातील शिक्षिका श्रीमती म्याना मॅडम यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री छिंदम सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. शिक्षक प्रतिनिधी सौ साळुंखे मॅडम यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा परिचय करून दिला.

प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मुत्याल सर यांनी सत्कार उद्घोषणा केली . या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील माजी विद्यार्थी चि. ओम सानप व कु. खुशी जाधव या दोघांनी खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवल्याबद्दल, तसेच पद्मशाली समाजाचे भूषण असलेले ज्यांनी पद्मशाली समाजाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवले असे देवदत्त गुंडू व नुकतेच जिने अतिशय कठीण अशी एमबीबीएस ची परीक्षा उत्तीर्ण केली अशी कु. प्रेरणा छिंदम या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विश्वस्त श्री बाळकृष्ण सिद्दम यांनी अहवाल वाचन केले. उपमुख्याध्यापक श्री पांडुरंग गोने यांनी वर्षभरात झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धा व इयत्ता दहावी बारावी मध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरणाचे यादी वाचन केले.पर्यवेक्षक श्री चन्ना यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तानाजी काळुंगे यांनी केले. सौ गुडेवार मॅडम यांनी उत्कृष्ट कार्यक्रम पत्रिका केली. यावेळी प्रत्येक इयत्तेतील एक याप्रमाणे सर्व इयत्तांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सौ शोभा बडगू ,श्री रावसाहेब इंगळे ,श्री अनंता गाली,श्रीमती ज्योती कराळे ,श्रीमती कल्याणी म्याना, सौ कविता गुडेवार सौ रेणुका खरदास,श्रीमती मनिषा राठोड ,श्री पवन गालपेल्ली, सौ माधुरी बोरुडे , सौ राधिका कोंडा या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ मथुरा आढाव ,श्री अजय न्यालपेल्ली ,श्री निलेश आनंदास,श्री सुहास बोडके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने श्रीमती म्याना मॅडम यांनी केली.

मंगळवार दि.3/1/2026 रोजी संस्थेने विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर यांच्यासाठी स्नेहभोजन दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे