ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून काढलेली दीड लाखांची रक्कम पळवली

अहमदनगर प्रतिनिधी

माजी सैनिकाने शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून काढलेली दीड लाखांची रक्कम असलेली पिशवी दोन अनोळखी इसमांनी त्यांचे लक्ष विचलीत करत हातचलाखीने पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि.८) दुपारी दोनच्या सुमारास स्टेट बँकेच्या गेट जवळ घडली.

याबाबत सुभाष पोपट गरड ( वय ४१, रा. निंबोडी, ता. नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गरड हे भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले आहेत.

त्यांनी मंगळवारी (दि.८) नगरमध्ये येवून स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून कामानिमित्त दीड लाखाची रोकड काढली व ती त्यांच्या जवळील पिशवीत ठेवली. बँकेतून बाहेर पडून ते गेट जवळ आले असता त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम आले. त्यांनी गरड यांना बोलण्यात गुंतवले.

तसेच त्यांचे लक्ष विचलीत करुन त्यातील एकाने हातचलाखी करत त्यांच्या जवळील रोकड असलेली पिशवी काढून घेत तेथून पोबारा केला. थोड्या वेळाने रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर गरड यांनी आरडाओरडा केला.

मात्र तोपर्यंत हे दोन भामटे पसार झाले होते. त्यानंतर त्यांनी भिंगार कँप पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे