ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात मोबाईल शॉपीतील वादातून दोन गटात राडा

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहराच्या स्टेशन रोड परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल खरेदीच्या व्यवहारातून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर विनयभंग व हाणामारीत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.

या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत. या घटनेत 20 वर्षीय युवतीने मोबाईल शॉपीतील व्यक्तीवर विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर दुसरीकडे, संबंधित दुकानदाराने युवती व तिच्या नातेवाईकांकडून मारहाण व दुकानाची तोडफोड केल्याची फिर्याद दाखल केली आहे.

युवतीने मोबाईल शॉपीमधून जुना मोबाईल खरेदी केला होता. मोबाईलमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने आणि खाते सुरू होत नसल्याने ती रात्रीच्या सुमारास पुन्हा दुकानात गेली. यावेळी दुकानाच्या गल्ल्यावर बसलेला संजूर मल्लुद्दीन आलम शेख (वय 44, रा. रेल्वे स्टेशन परिसर) याने तिच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केली. युवतीने नकार दिला असता त्याने वाईट हेतूने तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. तसेच पीडितेच्या जातीचा उल्लेख करत अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी शेख विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, याच घटनेत दुसरी बाजू म्हणून मोबाईल दुकानदार संजूर मलुद्दीन आलम शेख यांनीही कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी एका युवतीने त्यांच्याकडून 2 हजार 200 रुपयांना जुना मोबाईल खरेदी केला.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे