ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भाजप नेत्यावर ईडीची कारवाई, ७० कोटींची संपत्ती जप्त

नवी मुंबईतील सरकारी जमिनीशी संबंधित एक घोटाळा उघड झाला असून त्यामध्ये भाजप नेत्याचं नाव समोर आले आहे.

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने धडक कारवाई करत तब्बल ७० कोटींची संपत्ती जप्त केली. मनी लाँड्रिंग (पैशांची अफरातफर) प्रकरणात ईडीने भाजप नेत्याच्या मालकीचे तब्बल १८ कोटी रुपयांचे जमिनीचे भूखंड सोमवारी जप्त केले आहेत.

आतापर्यंत त्यांची ७० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. ईडीने कारवाई केलेल्या भाजप नेत्याचे नाव जेएम म्हात्रे असे आहे ईडीने रायगड जिल्ह्यातील उलवे अन् उरण येथील म्हात्रे यांची संपत्ती जप्त केली आहे. पनवेल तालुक्यातील मौजा वहाळ येथील जमिनींशी संबंधित ईडीने कारवाई केली.

सरकारी नोंदींमध्ये वन विभागाच्या मालकीच्या म्हणून नोंद आहे. पण या जमिनी बेकायदेशीरपणे व्यक्तींच्या नावावर हस्तांतरित केल्या गेल्याचा आरोप आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याचा तपास ईडीकडून केला जातोय. या कारवाईमुळे नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ईडी आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामध्ये आणखी काही लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत म्हात्रे यांच्या संपत्तीच्या जप्तीचा तात्पुरता आदेश दिला आहे. नवी मुंबईतील उरण आणि उलवे येथील जेएम म्हात्रे यांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

या मालमत्तांची किंमत अंदाजे ₹१७.७४ कोटी आहे. या मालमत्ता भाजप नेते जे.एम. म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत. उरण आणि उलवेतील या मालमत्ता बेकायदेशीर व्यवहारांद्वारे मिळवल्याचा दावा ईडीने केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत ही जमीन विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही.

हे प्रकरण रायगडच्या पनवेलमधील एका एफआयआरमधून सुरू झाले. सरकारी रेकॉर्डमध्ये फेरफार करून, वनविभागाच्या मालकीची जमीन खासगी व्यक्तींच्या नावावर दाखवण्यात आली. त्यानंतर, नवी मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी हीच जमीन सरकारने संपादित केली तेव्हा त्याची भरपाई खऱ्या मालकाला (सरकारला) मिळण्याऐवजी खासगी व्यक्तींच्या खिशात गेली.जे.एम. म्हात्रे हे बऱ्याच काळापासून राजकारणात सक्रिय आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जेएम म्हात्रे हे भाजपमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक वर्षे शेतकरी आणि कामगार पक्षा (पीडब्ल्यूपी) मध्ये काम केले होते. २०१५ मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले. त्यांनी पनवेल नगर परिषदेचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. पनवेल, रायगडच्या स्थानिक राजकारणात त्यांना प्रभावी मानले जाते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे