“केमिस्ट भवन” या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.
अहिल्यानगर

अक्षय तृतीयाच्या पवित्र मुहूर्तावर नगर जिल्हा व शहर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या “केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब शिंदे केमिस्ट भवन” या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
याप्रसंगी आमदार सत्यजित दादा तांबे उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथजी आप्पासाहेब शिंदे तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते या भव्य वास्तूचे लोकार्पण संपन्न झाले.
या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी केमिस्ट क्षेत्रातील बदलते स्वरूप, सेवा आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य व्यवस्थेत केमिस्टची भूमिका अधिक सक्षम आणि जबाबदार बनावी, असेही त्यांनी प्रतिपादन केले.
या सोहळ्यास जिल्हा व शहर तालुका केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर, उपाध्यक्ष सूर्यकांत उजाडे, गणेश वाणी, बाळासाहेब बेंद्रे, सचिन शिंदे, प्रशांत उबाळे, अतुल चांगले आदी मान्यवरांचा समावेश होता.




