ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात ​हॉस्पिटलमध्ये १८ लाखांची अफरातफर

अहिल्यानगर

​अहिल्यानगर -शहरातील माळीवाडा भागातील सरस्वती हॉस्पिटलमध्ये विश्वासाचा भंग करून सुमारे १८ लाख रुपयांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल सुरेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी विष्णू जगन्नाथ शिरसाट याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू शिरसाट हा एप्रिल २०२५ पासून सरस्वती हॉस्पिटलमध्ये ॲडमिन आणि कॅशियर म्हणून कार्यरत होता. हॉस्पिटलच्या दैनंदिन कामकाजाची आणि बिलांची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, मागील वर्षभरातील बिलांच्या हिशोबात तफावत असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. संशय आल्याने हॉस्पिटलच्या टीमने मार्च २०२६ मध्ये संपूर्ण हिशोबाची पडताळणी केली.

​या तपासणीत कॅशियर विष्णू शिरसाट याने संगनमत करून विश्वासाचा गैरफायदा घेऊन तब्बल १८ लाख रुपयांची अफरातफर केल्याचे स्पष्ट झाले. डॉ. जाधव यांनी या रकमेबाबत विचारणा केली असता, आरोपीने पैसे देण्यास असमर्थता दर्शवली.

हॉस्पिटलची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२) नुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र औटी करतआहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे