
मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेच्या माध्यमातून विरोधी मतदारांची नावे गायब करण्याचे षड्यंत्र – किरण काळे. महिला आरक्षणाच्या आडून देश तोडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव फसला..
सध्या महाराष्ट्रासह देशातील २२ राज्यांमध्ये मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिम (एसआयआर) राबवली जात आहे. विरोधी मतदारांची नावे गायब करण्यासाठीचं हे सत्ताधाऱ्यांचं देश विरोधी षडयंत्र आहे. एसआयआर ही वोट चोरीची योजना आहे. निवडणूक आयोग आता वोट चोरी षडयंत्राचा सक्रिय भागीदार बनला असून हा लोकशाही वरील हल्ला असल्याचा गंभीर आरोप, ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे. आपली नावे गायब होणार नाहीत या साठी मॅपिंग करून घेत मतदारांनी जागरूक रहावे, असे आवाहन काळे यांनी केले आहे.




