ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ? लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी

राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवत आहे. 6 दिवासांत 203 छापे टाकण्यात आले असून यामध्ये 102 अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातील जवळपास 68 दुकानं आणि हॉटेल्स बंद करण्यात आली. आयएएस तुकाराम मुंढे यांनी नुकतीच अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर राज्यभरात तिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांविरोधातील कारवाईचा तडाखा लावण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हणत कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आता जनतेला थेट तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक आणि ई-मेल आयडी शेअर करण्यात आला आहे. अन्न व औषधाबाबत किंवा गुटखा आणि पानमसालाबाबत नेमकी कुठे तक्रार करायची याची नागरिकांनी माहिती नसते. त्यामुळे आता मुंढे यांनी नागरिकांनी थेट त्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.

अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर-

टोल फ्री क्रमांक : 1800222365

ई-मेल : jc-foodhq@gov.in

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे