ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा

अहिल्यानगर जिल्हा रूग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे काढून देण्याच्या आरोपावरून एजंटगिरी करणार्‍या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप राजेंद्र आंधळे (रा. गिरीवाडी, ता. पाथर्डी) व जालिंदर ऊर्फ प्रेमकुमार अरूण वारे (रा. भुतकरवाडी, बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची (17 एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणात 15 संशयितांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जिल्हा रूग्णालयातील काही कर्मचार्‍यांच्या संगनमताने कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, तसेच रूग्णालयात नोंद न करता थेट ऑनलाइन पोर्टलवर माहिती भरून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करण्यात येत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या गैरप्रकाराचा फायदा घेत अनेकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचेही समोर आले आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र प्रणालीचा आयडी आणि पासवर्ड चोरून किंवा गैरवापर करून ही प्रमाणपत्रे तयार करण्यात आली असल्याचा आरोप आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे