ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदाराला 35 हजार लाचेच्या जाळ्यात

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदाराला 35 हजार रूपयांची लाच स्वीकारताना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

बुधवारी (15 एप्रिल) सायंकाळी तोफखाना पोलीस ठाणे परिसरात ही कारवाई करण्यात आली. अनिल गोसावी असे पकडलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव असून या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

छळ प्रकरणी पीडित विवाहितेने पतीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान संबंधित संशयित आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस अंमलदार अनिल गोसावी याने तक्रारदाराकडे 50 हजार रूपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाणे परिसरात ही कारवाई करण्यात आली.

सापळ्यानुसार, गोसावी याने 50 हजारांच्या मागणीपैकी 35 हजार रूपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. तक्रारदाराकडून 35 हजार रूपये स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या घटनेची माहिती पोलीस दलात पसरताच पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोसावी याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे