अहिल्यानगर मनपा निवडणूक अधिकार्यांकडून उमेदवारांसाठी भोजनाचे दर जाहीर,असे ठरले मटन बिर्याणी दर….

अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याचे अवघे काही दिवस बाकी असताना निवडणूक निर्णय अधिकार्यांनी उमेदवारांच्या खर्चासाठी खानपानचे दर जाहीर केले.
त्यात शाकाहरी जेवण 115 ते 180 रुपयांना ठरवली असून, मटण प्लेट 240 तर, बिर्याणीची प्लेट 150 रुपयांना निश्चित करण्यात आली आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्वभूमीवर खर्चाचे दर वाढल्याने उमेदवारांचे खर्चाचे नियोजन कोलमडणार आहे.
महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे महापालिका प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. 30 डिसेंबर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना खर्चाची मर्यादेसह दर पत्रक निश्चित करून देण्यात आली आहे. निवडणूक कार्यालयाने उमेदवारांसाठी सुई दोर्यापासून ते थेट मंडप, ध्वज, बॅनर्स, प्रचार साहित्यासह खाद्य पदार्थांचे दर जाहीर केले.
चहा, पाणी बॉटल, टेबल, खुर्ची, व्हेज, नॉनव्हेज जेवण, बिर्याणी, डोसा, फ्लेक्स बोर्ड, बॉरिकेटिंग, फुलांचा हार असे अनेक बाबींचे दर निश्चित करण्यात आले आहे. आता त्या दरानुसार उमेदवारांना निवडणुकीत खर्च करता येणार आहे.
असे ठरले खानपानचे दर (रुपयांत)
चहा 10, कॉफी 15, पाणी बॉटल 17, पाणी जार 40, वडापाव 15, भजे 20, पॅटिस 15, समोसा 15, कचोरी 15, भेळ 20, ढोकला 115, राईस प्लेट 115, स्पेशल राईस प्लेट 180, मटन प्लेट 240, बिर्याणी 150, बिस्कीट 10 आईस्क्रीम 10, पोहे 20, डोसा 50, मिसळ पाव 60, पाव भाजी 60, शाबुदाणा खिचडी 25.
टेबल 30 ते खुर्चीसाठी 10 रुपयांचा दर
उमेवारांना मंडप देण्यासाठी 15 रुपये स्वेअर फुट दराने पैसे आकारण्यात येणार आहेत. टेबल 30 ते खुर्चीसाठी 10 द्यावे लागतील. नेत्यांच्या स्वागत कमानी उभारण्यासाठी आठ ते चार हजार रुपये आकारण्यात येणार आहेत.
सभांसाठी मैदानाचे दर निश्चित
महापालिकेच्या मैदानावर जाहीर सभांकरिता दर निश्चित करण्यात आले आहेत. सावेडी उपनगरातील जागिंग पार्क मैदान एका दिसाकरिता दहा हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
तर, गांधी मैदान विना स्टेजसाठी 3139 रुपये तर, स्टेजसह 15 हजार 646 असा दर निश्चित केला आहे. खासगी मंगल कार्यालयासाठी प्रतिदिन 50 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.




