अहिल्यानगर मधील पाईपलाईन रोडवरील तुळजाभवानी मंदिरामागे असलेल्या वंडर किड्स प्री स्कूलच्या स्पोर्ट डे चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
अहिल्यानगर

सावेडी गावातील कराळे हेल्थ क्लब मध्ये हा मेळावा संपन्न झाला. दरवर्षी वंडर किड्स अशा नवनवीन उपक्रमांची रेलचेल मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ठेवत असते.
कराळे हेल्थ क्लबचे संचालक प्रभाग क्रमांक सहा मधील भाजपाचे उमेदवार करण कराळे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते फीत कापून व स्कूलच्या मार्गदर्शक आशाताई जाधव यांच्या हस्ते रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
अविनाश क्लासेस चे प्रमुख प्राध्यापक अविनाश जाधव, वंडर किड्स स्कूलच्या संचालिका वैशाली जाधव, स्कूलच्या प्रिन्सिपल मोनिका दारव्हेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सीनियर केजीच्या मुलांनी मार्च पास करून पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रगीत झाले. नंतर खेळाच्या मेळाव्याला सुरुवात झाली.

बकेट गेम संगीत खुर्ची, टंबलिंग हॉकी,बनी कॅरेट असे विविध गेम्स घेण्यात आले. स्पर्धेनंतर विजेत्या खेळाडूंचा मेडल्स घालून गौरव करण्यात आला.यावेळी उदय कराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अविनाश क्लासेस आणि वंडर किड्स स्कुल हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभरणी करणाऱ्या शिक्षण संस्था आहेत . अविनाश जाधव , वैशाली जाधव मॅडम , दारव्हेकर मॅडम यांचे यासाठी मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

या खेळाच्या मेळाव्यात ख्रिसमस सणाचे औचीत्य साधून आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलाची सजावट करण्यात आली होती तसेच स्वागत कमानीपाशी सांताक्लॉज ख्रिसमस ट्री चा देखावा साकारला होता. पालकांनी आपल्या छकुल्यासोबत त्याठिकाणी सेल्फी काढला. खेळाच्या मेळाव्यातील प्रत्येक क्रीडा प्रकारात सहभागी खेळाडूंना टाळ्या वाजवूंन चिअर अप केले.

बुद्धिमत्तेबरोबरच , मुलांची खिलाडू वृत्ती , समयसूचकता आणि निर्णयक्षमता ,चपळता वाढविणाऱ्या या किड्स च्या स्पोर्ट्स डे या उमक्रमाची पालकांनी तोंडभरून स्तुती केली.
मेळावा यशस्वी करण्यासाठी वंडर किड्स प्री स्कूलच्या शिक्षक वृंदानी विशेष परिश्रम घेतले. स्कूल ची दुसरी ब्रांच वडगाव गुप्ता येथे सुरू झाली आहे. त्याठिकाणी देखील शाळेचे काम अशाच पद्धतीने सुरू आहे..




