AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल आयोजित 3 आणि 4 जानेवारी संक्रांत शाॅपिंग फेस्टिव्हल 2026
अहिल्यानगर

AR न्युज मिडियाच्या माध्यमातून न्युज पोर्टल आणि युट्यूब च्या खास महिलांसाठी खास डिजिटल व्यासपीठ गेले 4 वर्षांपासून चालु केले आहे..
AR न्युज नी वेळोवेळी विशेष पुस्तिका प्रकाशित केली आहे. उदा. १५ ऑगस्ट, गणपती, नवरात्र, दिवाळी विशेषांक प्रकाशित केले आहे. संक्रांत निमित्त शापिंग फेस्टिव्हल, दिवाळी शापिंग फेस्टिव्हल ,राखी शापिंग फेस्टिव्हल घेऊन महिलांना व्यवसाय प्रसिद्धी साठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.
त्यासोबतच ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ती चा सन्मान सोहळा २०२४, मातृदिवस निमित्ताने कर्तृत्ववान आई सन्मान २०२५ असे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला .

यावर्षी 3 आणि 4 जानेवारी 2026 शनिवार व रविवार आम्रपाली मंगल कार्यालय, गुलमोहर रोड या दिवशी संक्रांत शाॅपिंग फेस्टिव्हल आयोजित केले आहे.. यात वेगवेगळे स्टाॅल तसेच फुड्स स्टाॅल ही असणार आहे..

शाॅपिंग फेस्टिव्हल च्या उदघाटनासाठी ॲडव्हकेट सुविद्या तांबोळी (नोटरी पब्लिक गव्हरमेंट ऑफ इंडिया, व्हाईस प्रेसिडेंट अहमदनगर डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर बार असोसिएशन..) , श्री सुभाष दत्तात्रेय जाधव (री फॉरेस्टर) (योगा निसर्गोपचार तज्ञ ,योग शिक्षक ,एक्यूप्रेशर- एक्यूपंक्चर,एम .ए. सायकोलॉजी.) , डाॅ. ऐश्वर्या शहा – देवी
(नॅचरोपॅथी तज्ञ – आरोग्यवर्दीनी संस्थेवर पदाधिकारी..) राज्यस्तरीय भारत ज्योती प्रतिभा सन्मान. एक्सलन्स पुरस्कार. मिसेस नगर रनर अप अवॉर्ड .महाराष्ट्र लेजंड वुमन अवॉर्ड., डाॅ. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, सौ. प्राची थिगळे (प्राची किएशन- प्रसिद्ध आर्टिस्ट) ग्लोबल स्टार आर्टिस्ट अवॉर्ड.. कार्यक्रम चे सूत्रसंचालन – डाॅ. आरती जोशी..होम मिनिस्टर कार्यक्रम अँकर- प्रणाली कुलकर्णी – क्षिरसागर.. यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे..
तसेच 4 जानेवारी रविवारी संध्याकाळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी आयोजित केला आहे.. त्यामुळे सर्व महिला वर्गानी उपस्थित राहावे असे आवाहन AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल मुख्य संपादिका सौ. श्रुती बत्तीन मॅडम नी केले आहे..




