ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सोशल मीडियावरून ओळख तरूणाला लुटले, 3.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील सोशल मीडियावरून ओळख निर्माण करून तरूणाला भेटण्यासाठी बोलावून घेतल्यानंतर त्याला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेणार्‍या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी संशयित आरोपींकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि तीन मोबाईल असा एकूण तीन लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी आदेश नंदकुमार चेमटे (रा. भाळवणी, ता. पारनेर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून तीन इसमांशी त्यांची ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत संशयितांनी 12 ऑगस्ट रोजी चेमटे यांना भेटण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली.

शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेत आरोपी तेथून पसार झाले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपींबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले.

त्यानंतर पोलिसांनी साहिल युवराज ससाणे (वय 22, रा. कायनेटीक चौक), आकाश सुखदेव लवांडे (वय 22, रा. मालेगाव, ता. गेवराई, जि. बीड, सध्या रा. निंबळक, ता. अहिल्यानगर) आणि ओंकार भरत वाघ (वय 23, रा. निंबळक) यांना एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई सहायक निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय कौटे तसेच अंमलदार राकेश खेडकर, शैलेश रोहोकले, बापुसाहेब फोलाणे, देविदास खेडकर, राजू सुद्रीक, दीपक फुंदे, नवनाथ दहिफळे, किशोर जाधव, संपत खेडकर, राहुल गुंड आणि अरूण सांगळे यांच्या पथकाने केली.

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे