ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

ऐतिहासिक अहिल्यानगर येथील पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री महर्षी मार्कंडेय महामुनी मंदिर जीर्णोद्धारासाठी रु. ५१ हजारांची देणगी

शतकपूर्ती वर्षानिमित्त सुरू असलेल्या भव्य जीर्णोद्धार कार्यास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

अहिल्यानगर ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर नगरीतील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत व कुलदैवत असलेल्या श्री महर्षी मार्कंडेय महामुनी मंदिराला यावर्षी गौरवशाली १०२ वर्षे पूर्ण होत आहेत. समाजाच्या श्रद्धेचे, संस्कृतीचे आणि एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त भव्य जीर्णोद्धार व विस्तार प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याचे काम सध्या वेगाने प्रगतीपथावर आहे.

महर्षी मार्कंडेय महामुनी हे पद्मशाली समाजाचे कुलदैवत मानले जातात. समाजाच्या आध्यात्मिक, धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे ते प्रेरणास्थान असून त्यांच्या आशीर्वादाने समाजाने अनेक पिढ्यांपासून आपली संस्कृती आणि परंपरा जपली आहे. त्यामुळे या ऐतिहासिक मंदिराचे संवर्धन व जतन करण्यासाठी समाजबांधवांनी एकत्र येत जीर्णोद्धाराच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धार प्रकल्पांतर्गत दोन महिन्यांपूर्वी पहिल्या स्लॅबचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. स्लॅब पूजन सोहळ्याच्या वेळी मंदिराचे अध्यक्ष पैलवान श्रीकांत छिंदम यांनी मंदिराच्या पुढील बांधकामासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योजक व भाविकांनी उदार हस्ते आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक दात्यांनी मंदिर विकासासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

याच भावनेतून कमलाक्षी शंकर येमुल यांनी श्री महर्षी मार्कंडेय महामुनी मंदिराच्या जीर्णोद्धार निधीसाठी रु. ५१,०००/- इतकी देणगी देऊन समाजाप्रती असलेली आपली श्रद्धा आणि बांधिलकी व्यक्त केली. त्यांनी ही देणगी मंदिराचे अध्यक्ष पैलवान श्रीकांत छिंदम यांच्याकडे सुपूर्त केली. त्यांच्या या उदार योगदानाबद्दल मंदिर समितीच्या वतीने विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी शकुंतला गुंडू, अंबिका सामलेटी, रेणुका बत्तीन, सुनंदा कुरापाटी, लक्ष्मी नक्का, पोलिस अधिकारी राहुल गुंडू, विनायक गुडेवार, महेश सब्बन, पद्मशाली ज्ञाती समाजाचे अध्यक्ष संजय वल्लाकट्टी, माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, दत्तात्रय कुरापट्टी, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे संचालक राजू म्याना, पद्मशाली युवा शक्ती ट्रस्टचे खजिनदार दीपक गुंडू यांच्यासह समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगरच्या धार्मिक आणि सामाजिक इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या या मंदिराच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त सुरू असलेला जीर्णोद्धार प्रकल्प हा केवळ बांधकामाचा उपक्रम नसून समाजाच्या एकतेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनाचा संकल्प आहे. मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार असून भावी पिढ्यांसाठी हा आध्यात्मिक वारसा अधिक भव्य आणि आकर्षक स्वरूपात जतन केला जाणार आहे.

मंदिराच्या उर्वरित बांधकाम साठी समाजातील सर्व दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

“श्री महर्षी मार्कंडेय महामुनींच्या कृपेने समाज एकवटला, आणि शतकपूर्ती वर्षात भव्य मंदिर उभारणीचा संकल्प साकार होत आहे.”

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे