ब्रेकिंगमहाराष्ट्र
जरांगे पोहोचण्याआधीच आझाद मैदान फुल्ल..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा बिगुल वाजवणारे मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत.
अंतरवाली सराटीतून 27 ऑगस्ट रोजी त्यांनी मोर्चाला सुरुवात केली. पहिला मुक्काम किल्ले शिवनेरी येथे झाला. शिवनेरीचे दर्शन घेऊन त्यांनी आंदोलनाचा निर्धार अधिक दृढ केला.
थोड्याच वेळात जरांगे पाटीलांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात पोहचून आजच्या दिवशी ते तिथे आंदोलन करणार आहेत.
परंतु, जरांगे पाटील पोहोचण्याआधीच आझाद मैदान फुल्ल झालं असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा आंदोलकांनी मैदान खचाखच भरलं. 5 हजार आंदोलकांची मर्यादा ओलांडली अजूनही मोठ्या संख्येनं आंदोलक मुंबईत येत आहेत.
दरम्यान, आझाद मैदानाबाहेरही मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित आहेत. हायकोर्टाकडून आझाद मैदानात केवळ 5 हजार आंदोलकांना आंदोलनाची परवानगी देण्यात आलीय.