
पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने रक्षाबंधन कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा करण्यांत आले.या कार्यक्रमांस संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी यांचे अध्यक्ष तेखाली आणि प्रमुख पाहूण्या म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संघम च्या अध्यक्षा संगीताताई इंदापुरे यांचे हस्ते तसेच महाराष्ट्र राज्य पद्मशाली आॅफीशियल विभाग संघमचे अध्यक्ष लोकापती मिठ्ठापल्ली, संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना, सचिव यशवंत इंदापुरे, खजिनदार नागनाथ गज्जम , विवेकानंद श्रीपती यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
प्रथम सर्व मान्यवरांचे हस्ते श्री मार्कंडेय प्रतिमापुजन करून पुष्षहार अर्पण करण्यांत आले.त्यानंतर नारळ वाढविण्यांत आले. सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रस्तावना अरूणा कन्ना यांनी केले. यानंतर संगीताताई इंदापुरे यांचे हस्ते श्रीहरी कुरापाटी यांना राखी बांधून पेढे दिले.सदर प्रसंगी सर्व महिलानीही उपस्थित मान्यवरांना राख्या बांधले आणि पेढे दिले.
या प्रसंगी भारती सग्गम यांनी नारळी पौर्णिमा सण कोळी बांधवांचा मोठा सणअसल्याचे सांगून सदर दिवशी समुद्र पुजन करून नारळ अर्पण करण्याची प्रथा असल्याचे सांगून त्याच दिवशी बहिण भावास राखी बांधून बहिणीचे रक्षण करण्याचे आवाहन करतात असे सांगितले. संगीताताई इंदापुरे यांनी सेवानिवृत्त संघाचे रक्षाबंधन कार्यक्रम स्त्युत्य असून जेष्ठांनी पुढच्या पिढीला आचार विचाराचे देवाण घेवाण करण्यासाठीच रक्षाबंधन सण साजरा करतात. त्यासाठी पौराणिक कथेतील भगवान श्रीकृष्ण द्रोपदी या बहिण भावाची गोष्ट सांगून रक्षाबंधनाचे महत्व पटवून दिले.
अविनाश संगा व भारती सग्गम हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
या कार्यक्रमांस चिमुकली आद्या मिठ्ठापल्ली, श्रीदेवी मिठ्ठापल्ली,निता इंदापुरे,राधा बंडी, निलावती केंची, अनुराधा मेरगू, ममता बोलाबत्तीन, वरलक्ष्मी गोटीपामूल, राजश्री बेनगिरी, श्यामकुमार बेनगिरी, लक्ष्मीकांत दंडी , श्रीनिवास बोलाबत्तीन, दशरथ इंदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होणेसाठी अविनाश संगा, देविदास मेरगू, सुशिलकुमार चिलका, मुरलीधर बंडी आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरूणा कन्ना यांनी केले तर आभार प्रमिला वडीशेरला यांनी मांडले.



