ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी ६७५ समाधी सोहळा आयोजन

डोंबिवली

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी ६७५ समाधी सोहळा डोंबिवली मध्ये दिनांक २२ जुलै २०२५ रोजी गणपती मंदिर इथे सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात आला . परंतु डोंबिवली मध्ये हा सोहळा नंतर येणाऱ्या एखाद्या रविवारी हॉल मध्ये साजरा करण्यात येतो कारण प्रत्येक समाज बांधवाला , मुलांना ,सहभाग घेता येईल त्याला अनसुरून ०३ ऑगस्ट २०२५ रोजी शुभमंगल कार्यालय डोंबिवली पूर्व इथे सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात नामदेव महाराजांची पूजा आरास , सजावट ने करण्यात आली . डोंबिवली च्या नामदेव शिंपी समाजाच्या महिलामंडळाने सुश्राव्य भजन करून सर्वाना मंत्रमुग्ध केले .

प्रेक्षकात ६५ ते ८५ वयाचे जेष्ठ नागरिक सुद्धा तरुण पिढीबरोबर अगदी दंग होऊन नाचत होते.

कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आमदार- श्री राजेशजी मोरे(डोंबिवली ग्रामीण ) मा. नगरसेवक(क.डो.म. प.) व परिवहन सदस्य मनसे -श्री प्रल्हादजी म्हात्रे , डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष श्री मितेशजी पेणकर , सरचिटणीस श्री प्रकाशजी पवार , सरचिटणीस – आशिष राजगौर व भाजप चे कल्याण जिल्हा अध्यक्ष श्री नंदू परब. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राहुल गणपुले व सुनील पवार विभाग प्रमुख किरण पाटील स्मिता माळवदे- मुख्याध्यापिका ल.पां, जगदाळे गुरुजी विद्यालय मालाड पूर्व , शिक्षक व समाजसेवक -श्री गणेश हिरवे , उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पूजा अरण्यात आली.

वय वर्ष ६५ पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकाचा सन्मान करण्यात आला , १०वी , १२ वी , १५ वी , व इतर विशेष शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला . तसेच लग्नाची ५० वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्याचे ही सन्मान करण्यात आला .

कार्यक्रमाला भरीव देणगी देऊन आर्थिक सहकार्य केलेल्या समाजबांधवांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला. दिवंगताना श्रद्धांजली देण्यात आली.

आलेल्या सर्व मान्यवरांनी नामदेव माहाराज चा इतिहास, त्यांचे कार्य , त्यांची भक्ती या वर माहिती दिली व समाज कल्याण वर मार्गदर्शन वर संभाषण केले.महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ स्वाती पां हिरवे व मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप सलगरे यांनी अहवालवाचन , व समाजाची हातात असलेली कामे या वर समाजबांधवांना माहिती दिली शिंपी बिजनेस फोरम च्या कार्यकर्त्यांनीं त्यांच्या फोरम बद्दल कामकाजाबद्दल व आर्थिक बाजू सक्षमीकरण्यासाठी शिंपी बिजनेस फोरम सर्वाना कशी मदत करू शकेल याचे मार्गदर्शन केले. एकमेका साह्य करू अवघे होऊ श्रीमंत हे तत्व त्यांनी समजावून सांगितले.

माहाराजांची आरती व महाप्रसाद व आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात नामदेव शिंपी समाज मंडळ डोंबिवलीचे सर्व पदाधिकारी कमिटी मेंबर्स , कार्यकारी मंडळ, व समाजबांधवानी हातभार लावला.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे