ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात नारळी पौर्णिमा शोभायात्रेत ‘महाकाली ऍक्ट’ नृत्याचा जलवा , 32 मुखी महाकाली अवतार ठरला मुख्य आकर्षण

अहिल्यानगर

शिवराज्यकर्तेप्रतिष्ठान व श्री एकदंत मित्र मंडळाने जिंकली नगरकरांची मने..महाकाली नृत्याचे सादरीकरण विविध चित्तथरारक प्रयोगांसह सादर..  नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा मिरवणुकीत श्री एकदंत गणेश मित्र मंडळ आणि शिवराज्यकर्तेयुवा प्रतिष्ठान यांनी सादर केलेल्या महाकाली ऍक्ट या अद्वितीय नृत्य प्रयोगाने नगरकरांचे मन जिंकले. नगर शहरात आणि महाराष्ट्रात प्रथमच सादर झालेल्या या प्रयोगाने शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरवत मिरवणूक मार्गावर हजारोंची गर्दी ओढवली.

या भव्य शोभायात्रेची सुरुवात श्री मार्कंडेय मंदिर येथून झाली. त्यानंतर महामुनी चौक – चितळे रोड – दिल्ली गेट – नवरंग व्यायाम शाळा – बागडपट्टी – नेता सुभाष चौक मार्गेपुन्हा श्री मार्कंडेय मंदिर येथे येत, गांधी मैदान येथे मिरवणुकीचा समारोप झाला. संपूर्ण मार्गावर प्रेक्षकांच्या गर्दीने उत्साहाचे वातावरण रंगले होते.

श्री श्याम आर्ट, इंदोर तर्फे सादर झालेल्या या महाकाली ऍक्टमध्ये ‘काली महाकाली’, ‘आदि अग्नी अनंत अग्नी’, ‘भोला नाचे मलंग’ यांसारखी ऊर्जावान गाणी, देवी ऍक्ट, देवी पूजन, साडी-चोळी भरणं आणि थरारक अग्नी तांडव सादर करण्यात आले. या सादरीकरणातील रौद्र, तेजस्वी आणि मंत्रमुग्ध करणारे भावदर्शन पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मिरवणूक मार्गाच्या प्रत्येक चौकात या महाकाली नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या महाकाली देवीच्या वेशभूषेत कलाकारांनी वेगवेगळी नृत्य सादर करत प्रेक्षकांचे लक्ष वेधले. महाकालीच्या विविध रूपांचे दर्शन घडविण्यात आले. प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांच्या गर्दीने प्रांगणे फुलून गेले होते.

या महाकाली नृत्यात 15 कलाकारांनी महाकालीचा वेश धारण केला होता. महाकालीला जसे पारंपरिक पद्धतीने सजवले जाते, तसेच दागिने, वस्त्रे, शस्त्रे आणि अलंकारांसह या कलाकारांनी स्वतःला सजवून यात सहभाग घेतला.

विशेष म्हणजे, या 15 कलाकारांपैकी एका कलाकाराने 32 मुखी महाकाली अवतार साकारला होता, ज्यामुळे संपूर्ण सादरीकरणात तो अवतार मुख्य आकर्षण ठरला. भव्य दिव्य अशा या साजशृंगारातून महाकाली देवीची जिवंत प्रतिमा मिरवणुकीत अवतरल्यासारखी भासत होती. या देखण्या आणि दैवी रूपामुळे मार्गावरील प्रत्येक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाला.

श्री एकदंत गणेश मंडळ आणि शिवराज्यकर्तेप्रतिष्ठान दरवर्षी काहीतरी वेगळे, आगळेवेगळे सादरीकरण करतात. त्यामुळे या संस्थांच्या कार्यक्रमांची नगरकरांना विशेष प्रतीक्षा असते. यंदाच्या सादरीकरणाने तर पाहणार्‍यांची मने जिंकलीच, पण त्यांच्या कौतुकाची आणि अभिनंदनाची लाट संपूर्ण मार्गावर उसळली. अशा दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण सादरीकरणाची उंची दरवर्षी वाढवणं हीच खरी कला! असे नागरिकांकडून मतप्रदर्शन करण्यात आले.

या भव्य सादरीकरणाचा कळस गाठत, अखेरीस महाकाली देवीला साडी-चोळी अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. पण त्यापूर्वी संपूर्ण मिरवणुकीत ज्या महाकालीसाठी जे जे पारंपरिक, धार्मिक व सांस्कृतिक नृत्यप्रकार सादर होतात – त्या सर्व कलांचे दर्शन नगरकरांना या एकाच ठिकाणी झाले.

वेगवेगळ्या वेशभूषेतून आणि रंगीबेरंगी साजशृंगारातून देवीचे विविध रूप उलगडले, कधी रौद्र, कधी करुणामय, तर कधी उत्साही रूप पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. अग्नी तांडवच्या वेळी तर कलाकारांनी अग्नीचे फवारे उडवून संपूर्ण वातावरणात थरार आणि रोमांच निर्माण केला. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषांच्या निनादात आणि टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्येक नृत्याने वेगळीच ऊर्जा निर्माण केली.

मिरवणूक मार्गावर प्रत्येक ठिकाणी उत्सुकतेने थांबलेली गर्दी, ढोल-ताशांचा गजर, जयघोषांचा निनाद आणि महाकालीचे थरारक नृत्य – या सर्वांनी मिळून यंदाची नारळी पौर्णिमा नगरकरांसाठी आयुष्यभर लक्षात राहील अशी बनवली. कार्यक्रम संपता-संपता प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता – हे दृश्य मी का चुकवलं? आणि ज्यांनी पाहिलं, त्यांनी अभिमानाने सांगितलं – अशी मिरवणूक पुन्हा कधी होणार?

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओंकार बुरगुल, ऋषीकेश सामल, अमर सादुल, यश सामल, विनीत इराबत्तीन, माधव उडता, रोहन सामल, वरद अन्नलदास, ओंकार अन्नलदास, आकाश हरबा, शिवा कोंडा, दिनेश नागुल, गौरव कन्ना आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे हा प्रयोग नगरच्या सांस्कृतिक इतिहासातील अविस्मरणीय ठरला..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे