
बारामती म्हणजे पवार अस समीकरण हे अनेक दशके राज्याच्या राजकारणात रुजले आहे.
सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यास भाजपाने पवार घरातील कुणालातरी उमेदवारी द्यायचे असे ठरवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
याआधी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांचे पुत्र पार्थ पवार लढणार अशी चर्चा सुरू होती. पण अचानक सुनेत्रा पवारांची चर्चा सुरू झाल्याने राजकिय चर्चांना उधाण आले.
बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, खडकवासला, भोर- वेल्हा हे विधानसभा मतदारसंघ येतात.