ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर महापालिकेच्या हलगर्जीमुळे रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग..

अहिल्यानगर

महिनाभरापासून कचरा न उचलल्याने शहरात दुर्गंधी, नागरिक त्रस्त – आरोग्य धोक्यात.. पद्मा नगर परिसरातील महिलांचा संतप्त सूर..

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना स्वतःचा घरगुती कचरा दिवसानुदिवस साठवून ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. रस्त्यांवर मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण झाली आहे.

ही परिस्थिती नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी ठरत आहे. महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी पाईपलाईन रोड व पद्मा नगर परिसराची पाहणी केली. मात्र पाहणी दरम्यान नागरिकांनी थेट प्रश्नांचा भडिमार करत त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.

विशेषतः महिलांनी “आयुक्त साहेब, कचरा टाकू तरी कुठे?” असा थेट सवाल करत प्रशासनाची झोप उडवली. या परिसरातील रहिवाशांच्या मते, मागील अनेक दिवसांपासून कचरा उचलण्याची कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अस्वच्छतेमुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास, डासांचे प्रमाण आणि दुर्गंधी यामध्ये कमालीची वाढ झाली आहे.

याचा परिणाम लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्ती यांच्या आरोग्यावर होत आहे. तसेच माजी नगरसेवक निखिल वारे यांनी माघील आठड्यात कचरा संकलना बाबत आवाज उठवत महापालिकेने गेल्या तीन महिन्यांपासूनचा कचरा संकलन कर घेऊ नये. कारण महापालिकेकडून कचऱ्याच्या संदर्भात कुठल्या ही सुविधा मिळत नाही.

तरी लवकरात लवकर महापालिकेने स्वच्छतेसंबंधी ठोस पावले उचलावीत व, दररोज नागरिकांच्या घरोघरी जाऊन घंटागाडी द्वारे कचऱ्याचे संकलन करावे. महानगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन, कचरा संकलन व विल्हेवाट व्यवस्था तातडीने पूर्ववत करावी. अशी मागणी आयुक्त डांगे यांच्याकडे करण्यात आली.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, शहरातील कचरा संकलन व्यवस्थेतील अडचणींची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. सध्या कार्यरत असलेल्या कचरा संकलन एजन्सीच्या कार्यक्षमतेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे की, ही एजन्सी हटवून नव्या एजन्सीकडे कचरा संकलनाची जबाबदारी सोपवली जाईल.

नवीन एजन्सीसोबत कामकाजाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून, लवकरच शहरात नियमित, वेळेवर आणि यंत्रबद्ध कचरा संकलन सुरू होईल. नागरिकांना अस्वच्छतेमुळे होणारा त्रास थांबवणे आणि स्वच्छ शहर निर्माण करणे हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

यामध्ये कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांनी पालिकेवर विश्वास ठेवावा, आम्ही लवकरच समाधानकारक बदल करून दाखवू असे प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे