ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

मी पाहिलेला वारकऱ्यांचा भक्ती मेळा – लेखन श्रीनिवास बोज्जा.सामाजिक कार्यकर्ते.

अहिल्यानगर

काल पंढरपूरहुन येतांना अहिल्यानगर मधील वैष्णव सेवा भक्त मंडळ दिंडी ची भेट झाली, ही दिंडी गेले 34 वर्षांपासून नगर येथून निघते व याचे सेवा व्यवस्थापन सुनिलजी त्रिपाठी करतात, येथे भेट झाल्यावर अनेक ओळखीचे भेटलेत त्यात प्रामुख्याने आमचे मित्र कैलास मोकाटे, मार्गदर्शक नाना जाधव व इतर बरेच मंडळी होते. यांनी आमचा मान सन्मान त्या ठिकाणी केला, महाप्रसाद आम्हाला दिला.

गेले 6 दिवसापासून ही दिंडी पायी येत आहे, एकाच्याही चेहऱ्यावर थकल्या सारखे वाटत नव्हते, प्रत्येकजण एका आनंदात होता, प्रत्येकाची विठ्ठलाची भक्ती प्रखरतेने जाणवत होती. विशेष म्हणजे या दिंडीत 84 वर्षाची आज्जी सुद्धा होती व त्यांच्या मध्येही तीच ऊर्जा होती. या दिंडीचे एक वैशिष्ट्य म्हणजे यांनी स्वछतागृह मोबाईल व्हॅन ची व्यवस्था केली व त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही गेले 12-15 वर्षांपासून याची व्यवस्था करीत आलेलो आहोत व आमचे पाहुन आता 50% पेक्षा जास्त दिंडी मध्ये ही व्यवस्था केलेली आहे.

नक्कीच सदरची बाब ही नागरिकांच्या व वारकऱ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे, या साठी आर्थिक खर्च ही मोठा असतो व या शासनाने अनुदान दिले तर नक्कीच याची 100% अंमलबाजवणी होईल व सर्वांचेच आरोग्य चांगले राहील.

या वेळी या सर्वांच्या सांगण्यानुसार पंढरपूर या ठिकाणी भक्तांचे संख्यचे रेकॉर्ड होईल लाखो ने वारकऱ्यांची संख्या वाढेल, अनेक दिंडी मध्ये मागील पेक्षा 25% अधिक वारकरी नवीन समाविष्ट झालीत.

त्याच वेळी त्या ठिकाणहून निवृत्ती नाथाची पालकी जात होती या बाबत अशी माहिती मिळाली की ही पालकी नाशिक मधून निघते. या पालकी मध्ये अंदाजे 12-13 पेक्षा जास्त वारकरी समाविष्ट होते व या मध्ये एकूण 44 उप पालख्या सामील झालेले होते, त्यांचा दिमाखदार पणाही तसाच होता, इतक्या मोठया प्रमाणात वारकरी समाविष्ट आहेत त्यांची रोजची रात्री थांबण्याची, अंघोळीची, चहापाण्याची, नाश्ता जेवणाची व्यवस्था करणे म्हणजे फारच जिकरीची गोष्ट आहे व ते सहजपणे होते असे या वारकऱ्यांचे म्हणणे आहे.

दिवसेंदिवस भक्तांची वारकऱ्यांची संख्या वाढत चालली, या मध्ये नव्यानेही तरुणांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. नक्कीच हे तरुण या भक्ती मार्गाकडे वळलेत ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे पण या भक्तांना तरुणांना मला एकच सांगणं आहे .

आपण ज्या प्रमाणे विठू रुखमई ची भक्ती करता त्याच्या साठी 10-15 दिवस चालता भक्ती भावाने पूजा करता त्याच प्रमाणे आपल्या घरातील विठू रुखमई आई वडिलांची ही तितक्याच प्रामाणिक पणे पूजा करा सेवा करा नक्कीच तो विठू तुम्हाला पावल्या शिवाय राहणार नाही.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे