ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली समाजाचा बागुल पंडुगू सण ११ जुलैला रोजी साजरा करण्यात येणार आहे..

अहिल्यानगर

पद्मशाली समाजाचा बागेचा सण (बागुलू पंडुगू) दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेनंतर येणाऱ्या शुक्रवार दि. ११ जुलै रोजी साजरा होत आहे. 

पद्मशाली समाजामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून बागुलू पंडूगू हा सण म्हणजे बागेचा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो, अशी माहिती पंच कमेटी पद्मशाली ज्ञाती समाजाचे अध्यक्ष संजय वल्लाकट्टी यांनी दिली.

या दिवशी शितळा देवी (पोशम्मा तल्ली) आणि लक्ष्मीमाता (लचमम्मा तल्ली)यांची यथासांग पूजा अर्चना केली जाते.. देवीला नैवेद्य दाखवतात..लक्ष्मी मातेची जत्रा असते.

या सणाचे वैशिष्टे म्हणजे शितळादेवी (पोशम्मा) व लक्ष्मीआई (लचमम्मा) या देवींना नैवेद्य दाखवणे. हा नैवेद्य दाखवण्यामागे प्रमुख उद्देश असे आषाढ महिन्यात रोगराईचा वेगाने फैलाव होतो ही रोगराई थांबवून आम्हा सर्वांना चांगले आरोग्य प्रदान कर, अशा प्रकारचे साकडे देवीला घालण्याची पारंपारीक प्रथा आहे.

समाजातील प्रत्येक घरामध्ये गोड पुरी, मेथीची भाजी असे नैवेद्य  देवीला दाखवत व प्रत्येक जनसमुदायाकडून मिरवणूक काढून पोतराज यांना बरोबर घेऊन शितळादेवी मंदिर व बालिकाश्रम रोडवरील जाधव मळ्यातील लक्ष्मीदेवी मंदिरामध्ये जाऊन पूजाअर्चा करणे असे विधी होतात. या ठिकाणी मोठी जत्रा भरते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे