
“निरोगी तन आणि शांत मन याची गुरुकिल्ली म्हणजे योग” ही उक्ती सार्थ करत, माध्यमिक विभागाच्या प्राचार्या गीता तांबे व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. कांचन पापडेजा व पूर्व प्राथमिक च्या प्राचार्या यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून आपल्या विविध उपक्रमातून योग साधनेचे महत्व पटवून दिले.
योगसाधनेचे फायदे आणि योग साधना करणे का गरजेचे आहे. या संदर्भात योगगुरु पूनम वाच्छतानी तसेच शाळेतील योग शिक्षिका सौ. नयन तुपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी रिदमिक योगा हा सुंदर योगासन प्रकार अतिशय उत्कृष्टरित्या सादर केला. तसेच विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कार याचे प्रात्यक्षिक सादर केले. इतकेच नव्हे तर जागतिक संगीत दिनानिमित्त छोट्या बालचमुंनी योगाची महती एका गीतातून आपल्या सुरेल आवाजात सादर केली. या गीताला मार्गदर्शन संगीत शिक्षक श्री. पठारे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रियंका चारगुंडी व सौ.प्रियंका मंगलारप यांनी केले.याप्रसंगी माध्यमिकच्या प्राचार्या गीता तांबे यांनी आपल्याला सुदृढ राहण्यासाठी योग व प्राणायाम नित्यनेमाने करणे गरजेचे आहे व विद्यार्थ्यांनी दररोज न चुकता योग साधना करावी असे प्रतिपादित केले. तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. कांचन पापडेजा यांनी विद्यार्थ्यांना ओंकार मंत्राचे महत्त्व सांगून स्मरणशक्ती चांगली होण्यासाठी प्रत्येकाने दररोज ओंकार मंत्र जप करावा असा मौल्यवान सल्ला दिला.
पालकांचा सहभाग ही लाभला ..
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राम मेंघानी, उपाध्यक्ष रूपचंद मोटवानी, सचिव गोपाल भागवानी, खजिनदार दामोदर माखिजा, विश्वस्त महेश मध्यान, सुरेश हिरानंदानी, राजकुमार गुरुनानी, हरेष मध्यान यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा देत योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी बनण्याचे आवाहन केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.