सादोळा येथील चौकात शिवप्रेमींनी स्थापन केला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

माजलगाव माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे माजलगाव केसापुरी परतुर रोड वरील चौकात शिवप्रेमींनी व गावकऱ्यांच्या सहभागातून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आल्याने सादोळा गावच्या वैभवात मोठी भर पडली आहे माजलगाव तालुक्यातील सादोळा गावातील शिवप्रेमींनी व गावकऱ्यांनी सहभाग घेऊन माजलगाव केसापुरी परतुर रोड वरील सादोळा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा बसवण्यात आला आहे हा पुतळा 21 फूट उंचीच्या सब उतरल्यावर 14 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभा केला आहे छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातील पुतळ्यानंतर मराठवाड्यातील सर्वात उंच अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सादोळा येथे पहावयास मिळतो आहे.
गोदापट्ट्यातील मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सादोळा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा रोडवरील भर चौकात पुतळा उभारण्यात आल्याने सादोळा गावातील शिवप्रेमींचे व गावकऱ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गावा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा हीच सर्व शिवप्रेमींची व गावकऱ्याची अपेक्षा.