ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

ज्येष्ठ इतिहासकार श्री. पांडुरंगजी बलकवडे यांना शिवजयंतीचे औचित्य साधून धनलक्ष्मी प्रतिष्ठान तर्फे पुरस्कर प्रदान

पुणे

भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ इतिहासकार श्री. पांडुरंगजी बलकवडे यांचा तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून धनलक्ष्मी प्रतिष्ठान तर्फे प्रतिष्ठान चे संस्थापक श्री बाळासाहेब अमराळे व पदाधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवराय जिरेटोप व कवड्यांची माळ स्वरूपातील सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत आणि प्रेरणास्थान छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्मारक नुकतेच जपान ची राजधानी टोकियो येथे उभारण्यात आले. सातासमुद्रापार महाराजांचा पहिलाच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात ऑल जपान एसोसिएशन ऑफ इंडिया चे सदस्य श्री केशव विध्वंस तसेच या शिवस्वराज्य यात्रेसाठी भारतातून तब्बल ६२ लोकांनी जपान दौऱ्याची पर्यटन व्यवस्था तथा नियोजन करणाऱ्या पुण्यातील युनिक ट्रॅव्हलस चे संचालक आशिष हिंगमिरे यांचा देखील सन्मान चिन्हा देऊन सत्कार करण्यात आला..

यावेळी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे संग्राहक श्री अभिजित धोत्रे व शिवकालीन नाणी संग्राहक श्री अभिजीत भुजबळ यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांना पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी “इतिहासाची शौर्यगाथा” या विषयावर आपले विचार मांडले, त्यांनी आपल्या छत्रपती शिवराय व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार आणि आदर्श राज्यकर्ते म्हणून शिवछत्रपतींना प्रगतीशील राष्ट्रे देखील आपले प्रेरणास्थान मानत असल्याचा दाखला देत जास्तीत जास्त युवकांना लहानवयात शिवराय कसे आचरणात आणावे याची असंख्य उदाहरणे देत कार्यक्रमाची सांगता केली.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सौरभ अमराळे, पेशवाई क्रिएशन चे संचालक श्री राहूल येमूल, अतुल तासकर, अमराळे ज्वेलर्सचे संचालकश्री स्वप्निल अमराळे, शीतल अमराळे, श्री अमर हिंगमिरे यांनी देखील प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे