ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
भाविकांची प्रचंड गर्दी, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे दर्शन रांगेचे नियोजन कोलमडले
तुळजापूर

सुटीचा योग साधत रविवारी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याने मंदिर संस्थानचे दर्शनाचे नियोजन कोलमडले.
यावेळी धर्म दर्शनाला तीन तर सशुल्क दर्शन, मुख दर्शनाला दोन तासांचा वेळ लागत असल्याने भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत होता.
अधिक मासामुळे दर्शनाला गर्दी होत आहे. त्यातही रविवारी सुटीमुळे भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच मंदिराकडे भाविकांचे लोंढे दर्शनासाठी जात होते. दरम्यान, भाविकांची गर्दी वाढत असतानाही दर्शन रांगेला गती देण्यासाठी मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक उपाययोजना न केल्याने दर्शनाला विलंब लागत होता.