ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यांसोबत मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे

राज्यातील सर्वच भागात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर उर्वरित कोकणात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यांसोबत मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे आणि मुंबईत विसर्जन मिरवणुकीतही पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील सिंहगड रोज परिसरात जोरदार पाऊस झाला. सलग आलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागातील ओढे, नदी, नाले भरून वाहत आहेत. तर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

आज कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी तर विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या पिंकांचे नुकसान

पावसाने उशीरा का होईना, हजेरी लावल्याने पिण्याचा पाण्याच प्रश्न सुटण्याची आशा वाढली आहे. दुसरीकडे मात्र, पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच दुबार पेरणीमुळे त्रस्त असलेला शेतकरी हातातले पिक गेल्यामुळे आणखी अडचणीत सापडणार आहे.

ठाणे, रायगडसह रत्नागिरीत पावसाची हजेरी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील.

गुरुवारीही मुंबई, ठाणे, रायगडसह कोकण किनारपट्टी भागात पावसाने हजेरी लावली होती. आज ठाणे जिल्ह्याला आयएमडीने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यासोबत रायगड आणि रत्नागिरीसाठीही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे