ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

एस बी सी अन्याय निवारण कृती समिती च्या राज्य उपाध्यक्ष पदी श्रीनिवास बोज्जा यांची निवड

अहिल्यानगर

नगर एस बी सी अन्याय निवारण कृती समिती च्या राज्य उपाध्यक्ष पदी श्रीनिवास बोज्जा यांची निवड कृती समिती चे अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी लेखी पत्र देऊन कळविले असून या पत्रावर कृती समितीचे सर चिटणीस जितेंद्र कांचाणी यांची सही आहे.

श्री. बोज्जा हे गेले 20 ते 25 वर्षा पासून अहमदनगर शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्य करीत असून नुकतेच त्यांची पद्मशाली समाजाचे अध्यक्ष पदीही निवड करण्यात आली असून ते पद्मशाली समाजाचे कार्य ही अत्यंत चांगल्या प्रकारे करीत आहेत.श्री. बोज्जा हे पद्मभूषण मा. अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शना खाली अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक कार्य केले असून या बरोबरच अध्यात्मिक कार्य ही करीत आहेत.

श्री. बोज्जा हे प. प. माताजी श्री निर्मला देवी यांच्या सहजयोग समिती चे कार्य नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करीत आहेत. श्री बोज्जा यांचे शैक्षणिक कार्यात ही चांगले योगदान असून त्यांनी काही युवकांना घेऊन बोल्हेगाव येथे शाळा सुरु केली असून त्याचे काम ही उत्तम प्रकारे चालवीत आहे. लायन्स क्लब च्या माध्यमातून शहराचे अध्यक्ष पद भूषवून या क्लब मध्येही चांगले कार्य करीत आहेत. श्री बोज्जा हे दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे अनेक वर्षा पासून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव या विविध पदावर काम करून व्यापाऱ्यांना न्याय देण्याचेही काम करीत आहेत.

अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांची निवड एस बी सी अन्याय निवारण कृती समिती च्या राज्य उपाध्यक्ष पदी करण्यात आली ही बाब पद्मशाली समाजासाठी तसेच नगर जिल्ह्या साठी भूषणवह आहे. त्यांची निवड झाल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही व संपूर्ण महाराष्ट्रातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे