ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जपानची राजधानी टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण जपानची राजधानी असलेल्या टोकियो येथील एडोगावा शहरात झाले. हा महाराजांचा पुतळा संपूर्ण भारतभर शिव स्वराज्य रथयात्रेच्या माध्यमातून तब्बल ८५०० किमी चे अंतर पार करून सातसमुद्रपर थेट जपान येथे पोहोचला. या यात्रेचे संपूर्ण नियोजन जपान येथील पहिले भारतीय वंशाचे आमदार मा. श्री. योगेंद्र पुराणिक (योगी) यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

या शिवस्वराज्य यात्रेसाठी भारतातून तब्बल ६२ लोकांनी जपान साठी प्रस्थान केले..

या पुतळ्याचे अनावरण श्री राम मंदिर ट्रस्ट, अयोध्या चे विश्वस्त तसेच श्रीकृष्ण जन्मभूमी, मथुरा चे ट्रस्टी परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते झाले.

यावेळी जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक, चिंचवड देवस्थान चे विश्वस्त केशव विध्वंस तसेच दूरसंचार मंत्रालय भारत सरकार चे सल्लागार संकेत खरपुडे देखील उपस्थित होते.

या सर्व दौऱ्याची पर्यटन व्यवस्था तथा नियोजन पुण्यातील युनिक ट्रॅव्हलस चे संचालक आशिष हिंगमिरे यांना देण्यात ऐल होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे