अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या अहिल्या नगर महिला जिल्हाध्यक्षपदी सौ.मेघाताई डहाळे
अहिल्यानगर

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या अहिल्या नगर महिला जिल्हाध्यक्षपदी सौ.मेघाताई डहाळे.
राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ॲड राणी ताई स्वामी यांचा मार्गदर्शनाखाली नियुक्ती पत्र देण्यात आले.या वेळी मेघा ताई डहाळे यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या अहिल्या नगर महिला सेल जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने मी प्रामाणिकपणे काम करणार आहे .
तसेच समिती मार्फत गोरगरीबांचे प्रश्न मार्गी लावणार असून महिला ना येणार्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.समिती चे काम अहिल्या नगर मध्ये मोठ्या प्रमाणावर करणार असून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रिडा आदी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या समस्या कडे लक्ष देणार असल्याचे नवनियुक्त भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या अहिल्या नगर महिला जिल्हाध्यक्ष सौ.मेघाताई डहाळे यांनी सांगितले आहे.