ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भिंगारमधील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज

अहमदनगर

नगर शहरापासून काही अंतरावर असलेल्या भिंगार येथील गणेश विसर्जन मिरवणूक सायंकाळी निघणार आहे .या मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून ,मिरवणूक मार्गावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशी माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी दिली.

यंदा भिंगार कॅम्प हद्दीतील गणेश विसर्जन आठव्या दिवशी होत आहे. मानाच्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक वाद्यात दुपारी निघेल .त्यानंतर सायंकाळी विविध गणेश मंडळांकडून मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

या परिसरातील एकूण १८ सार्वजनिक गणेश मंडळांचा मिरवणुकीत सहभाग असेल. या मिरवणुकीसाठी मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. विविध ९७ पोलीस अधिकारी तसेच होमगार्ड आणि राज्य राखीव दलाचे पथकही मिरवणूक मार्गावर तैनात असणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे