तेजस बहुद्देशीय संस्था,नाशिक तर्फे झेप फाउंडेशन पुणे यांना राज्यस्तरीय समाज भूषण 2025 पुरस्कार प्रदान
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

02/03/2025 रोजी तेजस बहुद्देशीय संस्था, नाशिक यांच्यातर्फे दरवर्षी कृषी, साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या गुणवंत व्यक्तींचा राज्यस्तरीय विविध पुरस्कारांनी सन्मान केला जातो.
यंदा २०२५ या वर्षातील ‘राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार नुकताच तेजस बहुद्देशीय संस्था, नाशिक पुरस्कार निवड समितीने झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांना जाहीर केला आहे. कांताभाऊ राठोड हे झेप फाउंडेशन पुणे चे संस्थापक अध्यक्ष आहेत तर गोपाळ कळसकर हे झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य जळगांव जिल्हा सचिव आहेत. यांना आदर्श पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला.
तसेच झेप फाउंडेशन पुणे पदाधिकारी अश्विनी आवळे मॅडम, अशोक पाटील सर, स्मिता भंगाळे मॅडम यांनाही समाजभूषण पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर शंकर जाधव सर , सामाजिक कार्यकर्तेया अनघलक्षमी दुर्गा मॅडम, राजू पांचाळ सर यांना सुद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. पदाधिकारी वाळवा तालुका सचिव किस्ननात पाटील सर व सहकारी सोबत होते.
झेप फाउंडेशन,पुणे च्या माध्यमातून रोजगार मेळावे, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान ,महापुरुषांच्या विचारांचा प्रचार, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम, वृक्षलागवड असे विविध लोकहितोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
कांताभाऊ राठोड हे विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत. तसेच दैनिक बाळकडू , सेवा शक्ती,आयडियल इंडिया न्यूज वृत्तपत्रांचे पत्रकार आहेत. अशा विविध वृत्तपत्र व माध्यमांतून जनसामान्यांच्या समस्यांना त्यांनी वाचा फोडली आहे.
२ मार्च 2025 रोजी राजर्षी शाहू महाराज स्मारक सभागृह, कोल्हापूर येथे त्यांचा सन्मान व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी तेजस बहुद्देशीय संस्था, नाशिक च्या संस्थापक अध्यक्षा तथा सिने अभिनेत्री, चित्रपट निर्माती , दिग्दर्शक मेघाताई डोळस, अशोक कपूर ( सिने अभिनेता व दिग्दर्शक, मुंबई ), सुरेशभाऊ डोळस (ज्येष्ठ सिने अभिनेते व लोक कलावंत, पुणे), नथानियल सुज्ञान राव शेलार (ज्युनिअर धुमाळ,कोल्हापूर), संदीप कुडचीकार (अभिनेता होम मिनिस्टर,सांगली ) तसेच महेंद्र तुपे (लेखक, कवी , छत्रपती संभाजीनगर आदि प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती त्यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..
या पुरस्काराने विविध संस्थेतील, संस्थातून मित्रमंडळीकडुन समाज बांधवाकडून अभिनंदनचा चा वर्षा होत आहे.