ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

विवाहितेचा गळा आवळुन खुन करणारा प्रियकर अटकेत

अहिल्या नगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

प्रेमसंबंधातून चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा गळा आवळून खून करून तिने आत्महत्या केल्याचे व स्वतःही आत्महत्या करीत असल्याचा बनाव करणार्‍या तरूणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारस दत्तु सुरवसे (वय 29 रा. माळीगल्ली, गोदड महाराज मंदिराजवळ, कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो पसार झाला होता त्याला कोतवाली पोलिसांनी कर्जत येथून बुधवारी सायंकाळी ताब्यात घेत अटक केली आहे. संगीता नितीन जाधव (वय 35 मुळ रा. पारगाव खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा, हल्ली रा. मोहिनीनगर, केडगाव, अहिल्यानगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. केडगावमधील मोहिनीनगर येथे सोमवारी (24 फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली होती.

या प्रकरणी संगीता सचिन जाधव (वय 40 रा. मोहिनीनगर, केडगाव देवी मंदिरामागे, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. संगीता नितीन जाधव या पतीपासून विभक्त राहून गेल्या चार वर्षांपासून सारस सुरवसे याच्यासोबत एकत्र राहत होत्या. मात्र, काही महिन्यांपासून सारस हा संगिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार वाद घालत होता. यामुळे संगिता आपल्या मोठ्या बहिणीकडे केडगाव येथे राहायला आली होती. सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास संगिता आणि सारस यांच्यात जोरदार वाद झाले. घरच्यांनी त्यांच्या भांडण्याचा आवाज ऐकून दरवाजा ठोठावला. बराच वेळ दरवाजा उघडला नाही, त्यामुळे घरच्यांनी अधिक दबाव टाकला.

अखेर सारसने दरवाजा उघडला असता, संगिता बेशुध्द अवस्थेत जमिनीवर पडलेली होती, तर सारस स्वतः गळफास घेण्याचा बनाव करत होता. घटनेची माहिती मिळताच तातडीने रूग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी संगिताला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला व सारसचा शोध सुरू केला. तो बुधवारी कर्जत येथे असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे अधिक तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे