ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

अहमदनगरमध्ये रविवारी ‘आकाशाला गवसणी’ कार्यशाळा संपन्न

अहमदनगर

खगोल शास्त्रात मुलांना आवड निर्माण होण्यासाठी प्लस फाऊंडेशन अहिल्यानगर व एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र यांनी रविवार दि.२३ जून रोजी ‘आकाशाला गवसणी’ ही कार्यशाळा आयोजित केलेली होती.ही कार्यशाळा सारडा कॉलेज च्या बहुउद्देशीय हॉलमध्ये घेतली होती.

या कार्यशाळेत खगोलशास्त्राचा अभ्यास कसा करावा? आकाश निरीक्षणाची पूर्वतयारी, खगोलीय संज्ञा, उल्का वर्षाव निरीक्षण पद्धत, निरीक्षणाची नोंद पद्धत, ताऱ्यांचे वर्गीकरण, आकाशातील २० तेजस्वी तारे, ध्रुवतारा कसा शोधावा, आपले वस्तुमान तसेच तारकाचक्र, सौर घड्याळ, फोल्डेबल क्वाडरंट तयार करणे हे सर्व या कार्यशाळेत शिकवले गेले.

त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांचे मार्गदर्शन लाभले होते.. मुलांना किट देऊन प्रशिक्षण दिले गेले. या कार्यशाळेची वेळ सकाळी पहिली बॅच ०९.३० ते दुपारी ०१.०० तसेच दुपारी दुसरी बॅच ०२.३० ते संध्याकाळी ०५.३० वाजेपर्यंत अशी होती. 

या कार्यशाळेमध्ये मुलांसमवेत त्यांचे पालक तसेच आजी आजोबाही सहभागी झाले होते.कार्यशाळेसाठी माफक शुल्क २०० रुपये होते. नगरकरांनी तसेच नगर मधील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळा पूर्ण झाल्यावर त्याचे प्रमाणपत्र मुलांना दिले गेले.

इथून पुढेही विविध विषयांमधील व्याख्याने तसेच कार्यशाळा घेत राहू अशी खात्री प्लस फाउंडेशन च्या सभासदांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे