ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी 3.0 सरकारच्या या बजेटकडे उद्योजक, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. थोड्या वेळातच देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. बजेट सादर करण्यापूर्वी सीतारमण यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.

राष्ट्रपतींकडे अर्थसंकल्प सुपूर्द केला आहे आणि राष्ट्रपतींची अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे. अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का? करदात्यांना दिलासा मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे. तसेच महिला, शेतकरी, तरुणांसाठी कोणत्या घोषणा होणार? या सगळ्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

अर्थसंकल्पाकडून कोणत्या अपेक्षा ?

मध्यमवर्गाला आयकरात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

आयकराच्या 20 % , 30 % स्लॅबमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

स्टॅंडर्ड डिडक्शन 75 हजारांवरून 1 लाख रूपये होण्याची आशा

कॉर्पोरेट टॅक्समध्ये दिलासा मिळण्याची शक्यता 

NPS, EPS सारख्या पेन्शन स्कीमबाबत मोठ्या घोषणा शक्यता

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता

100 अमृत भारत रेल्वे गाड्या सुरू होण्याची शक्यता

10 हून अधिक वंदे भारत गाड्या सुरू होण्याची शक्यता

अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होऊ शकतात ?

1. इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्यास पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकतं

2. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त होण्याची शक्यता

3. सोन्यावर कर वाढवल्यास महाग होऊ शकतं

4. 10 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होऊ शकतं

5. पीएम किसान निधी 6 हजारांवरून 12 हजार होण्याची शक्यता

6. ‘एकीकृत राष्ट्रीय रोजगार धोरण’ अंतर्गत ग्रामीण भागातील पदवीधरांसाठी इंटर्नशिप आणली जाऊ शकते

7. आरोग्य क्षेत्राचं बजेट वाढवलं जाण्याचा अंदाज

8. मेट्रो शहरांमध्ये स्वस्त घरांची मर्यादा 45 लाखांवरून 70 लाख केली जाऊ शकते

9. गृहकर्जाच्या व्याजावरील सवलत 5 लाखांवर जाऊ शकते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे