श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विदयालयात २६ जानेवारी गणराज्य दिन कार्यक्रम संपन्न
अहिल्यानगर

श्रमिकनगर येथील श्री मार्कडेय प्राथमिक व माध्यमिक विदयालय येथे विदयालयाच्या प्रांगणात २६ जानेवारी २०२५ गणराज्य दिनी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री बाळकृष्ण सिद्दम सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त शंकरराव सामलेटी, राजेंद्र म्याना, भिमराज कोडम तसेच श्रमिक जनता नगर हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष श्री. विलास सग्गम, व संस्थेचे नव निर्वाचीत विश्वस्त तसेच श्रमिक जनता हौ. सोसायटीचे सेक्रेटरी श्री शंकर येमूल व सर्व पदाधिकारी तसेच श्रमिक जनता हौसिंग सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शाळेतील विदयार्थ्यांनी देशभक्ती पर गीत सादर केले. विविध स्पर्धा मधील यशस्वी विदयार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरील गणित- विज्ञान प्रदर्शना मध्ये व्दितीय क्रमांक मिळाल्याबाबत श्री कहेकर किरण प्रकाश यांचाही गौरव केला. या शुभ दिनी देशभक्तीची मुल्ये रुजविण्याकरीता विदयार्थ्यांनी विविध विषयावरती मुक्तछंदपणे चित्रे क्रिडांगणा वरती रेखाटली. त्यांच बरोबर अक्षर भारती या वाचन उपक्रमा अंतर्गत ५५९ पुस्तके शाळेतील ग्रंथालयाला भेट देण्यात आली. तसेच घडी डिटर्जेन्ट कडून साबण वाटप करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे श्रमिक जनता हौसिंग सोसायटी कडून शाळेतील विदयार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वागत प्रास्ताविक व सुत्र संचालन माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक श्री गोरे शशिकांत सर यांनी केले. तसेच प्राथ. व माध्य. विदयालयाचे क्रीडा व बौध्दिक स्पर्धा यादी वाचन सौ. सुरकुटला मॅडम, सौ. गाडेकर भारती, सौ वरुडे वैशाली, सौ. चिंतल जयश्री यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी योगदान दिले