ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

झुकते माप – हिरकणी सौ.अनिता गुजर यांनी खुपच सुंदर अशा शब्दात व्यक्त केलंय.. नक्की वाचा..

डोंबिवली

झुकते माप 

समोरच्या व्यक्तीसाठी म्हणजेच आपल्या व्यक्तीसाठी कधी तरी झुकते माप घेण्यात काहीच हरकत नाही त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याला नक्कीच जागा मिळते .आयुष्यात नेहमीच यश मिळते असे नाही कधी कधी अपयशाला ही सामोरे जावे लागते. अपयश आले तर नाराज होऊ नये कारण तीच तर यशाची खरी पायरी असते.आपण मुंगी ला बघितले का कधी? ती जेव्हा वर चढायचा प्रयत्न करते तेव्हा कितीतरी वेळा खाली पडते पण परत उठून ती चढण्याचा प्रयत्न करते अशी चिकाटी हवी आपल्यामध्ये. खाली पडण्यात अपयश नाही, पडून राहण्यात अपयश आहे. एखादया व्यक्तीबद्दल जर कोणी काही वावगे आपल्याला सांगितले तर आधी आपल्या मनाला विचारावे की खरंच ही व्यक्ती अशी असेल का? जोपर्यंत डोळ्यांनी बघत नाही तो पर्यंत कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नये. पण काही वेळा डोळ्यांनी बघितलेलेही पूर्णतः सत्य नसते . जे दिसते तसे नसते .म्हणूनच मनाची परीक्षा

डोळ्यांनी होते तर डोळ्यांची परीक्षा मनाने होते असे म्हणतात. आयुष्यात कोणत्याही गोष्टींचे टेन्शन घेऊ नये त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि प्रकृतीवर होतो. आलेल्या संकटातून बाहेर कसे पडावे याचा विचार करावा नुसती चिंता करत बसू नये कारण चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनून राहते. चिंता ही चितेपर्यंत पोचवते असे म्हणतात हे ही खरंच आहे…हो ना..?

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे