ब्रेकिंगमहाराष्ट्र
जिजाऊ मासाहेब आपले या महाराष्ट्रावर,भारतभूमीवर,हिंदू धर्मावर आणि आमच्या सगळ्या पिढ्यांवर अनंत उपकार आहेत..
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

आपल्या विश्वविजयी पुत्राने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने हा देश हा धर्म आणि सगळ्या देवळांची आणि देवांची सुरक्षा केली,आज आम्ही सगळे हिंदू आहोत त्याचं सगळ श्रेय आपल्याला आणि आपण घडवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जातं.
आपण संभाजी महाराजांवर जे संस्कार केले त्यामुळेच त्यांनी आपल्या शरीराचे तुकडे तुकडे होऊ देणं पसंत केले पण हिंदू धर्मा चा त्याग केला नाही आणि पापी औरंग्या च्या थोबाडावर सणसणीत चपराक ठेवून दिली! आपण असा पुत्र जन्माला घातला ज्याने हिंदू धर्मासाठी कसं जगावं याचं उदाहरण जगापुढे ठेवलं,आणि असा नातू जगाला दिला ज्याने हिंदू धर्मासाठी कसं मरायचे याचा आदर्श जगापुढे ठेवला !!!
आज आपल्या जयंती दिनी आपल्या चरणी कोटी कोटी वंदन आणि भगवा मुजरा..