दिनांक 6 जानेवारी रोजी लोणी गवळी येथे मेहकर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मा सिद्धार्थ खरात साहेब यांचा सत्काराचा कार्यक्रम
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

दिनांक 6 जानेवारी रोजी लोणी गवळी येथे मेहकर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मा सिद्धार्थ खरात साहेब यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मंत्री मा डॉ राजेंद्र शिंगणे साहेब होते. या सभेला मा सिद्धार्थ खरात साहेब यांनी त्यांना निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. मी सातत्याने मेहकर विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न, मतदारसंघात कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नसून तो सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहील.
सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका माझी राहील. असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना मा शिंगणे साहेब म्हणाले की माननीय खरात हे त्यांच्याकडेच पी ए तसेच पी एस होते त्यांनी अनेक मंत्र्याकडे काम केलेले आहे त्यांना मंत्रालयीन कामाचा अनुभव आहे. ते या मतदार संघाच्या प्रश्नासाठी व जनतेच्या कामासाठी अहोरात्र काम करून तुम्हाला न्याय मिळवून देतील असे आश्वासित त्यांनी केले.
याप्रसंगी मा नरेंद्रजी खेडेकर जिल्हा संपर्कप्रमुख मा श्याम भाऊ उमाळकर मा जालिंदर बुधवत मा लक्ष्मण दादा घुमरे मा आशिष रहाटे मा अनंतराव वानखेडे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाचे आयोजक मा सागर पाटील यांनी केले. त्यांनी त्यांच्या गावातील विकास कामाच्या अडचणी मांडल्या त्या सोडवण्यासाठी मा आमदार यांना विनंती केली.
यावेळी व्यासपीठावर मा लिंबाभाऊ पांडव मा देवानंद पवार मा किशोर गारोळे मा दत्ता घनवट मा संजय वडतकर मा विनायकराव टाले मा प्रदीप देशमुख एड विजय मोरे एड संदीप गवई अड आकाश घोडे मा नामदेवराव राठोड मा तुकाराम चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मा शैलेश बावस्कर यांनी केले. यावेळी त्यांची गावातून प्रचंड मिरवणूक काढण्यात आली होती.