ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

लाडकी बहीण योजना या ठिकाणी गुंतवू शकतात लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे, मिळू शकतील चांगले रिटर्न

अहमदनगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

राज्यात लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली असून याअंतर्गत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र महिलांनी हे पैसे खर्च न करता गुंतवावे, जेणेकरून येत्या काळात ते कामी येतील.राज्यात लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली असून याअंतर्गत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र महिलांनी हे पैसे खर्च न करता गुंतवावे, जेणेकरून येत्या काळात ते कामी येतील.लाडक्या बहिणींसाठी गुंतवणूक हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता. आजकाल अशा अनेक योजना उपलब्ध आहेत ज्या तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देतात आणि करही वाचवतात. अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही जास्त नफा मिळवू शकता.

लाडक्या बहिणीचे मिळालेले पैसे ‘या’ ठिकाणी गुंतवा; टॅक्स वाचेल आणि भरभरून रिटर्न्सही मिळतील

Post Office MIS

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एक रकमी रक्कम गुंतवावी लागते. 5 वर्षानंतर, तुमची मूळ जमा रक्कम तुम्हाला परत केली जाईल. सध्या या योजनेवर ७.४ टक्के व्याज आहे. या योजनेमध्ये एकल आणि संयुक्त खात्यांसाठी ठेवीच्या वेगवेगळ्या मर्यादा निश्चित केल्या आहेत.

एका खात्यात जास्तीत जास्त 9,00,000 रुपये आणि जास्तीत जास्त 15,00,000 रुपये संयुक्त खात्यात जमा केले जाऊ शकतात. यावेळी महिलांनी खात्यात 9,00,000 रुपये जमा केले, तर तुम्हाला 7.4% व्याजाने दरमहा 5,550 रुपये कमवू शकता.

लाडक्या बहिणीच्या पैशांनी सुरु करा ‘हा’ बिझनेस दर दिवसाला कराल हजारांची कमाई..

पीपीएफ

पीपीएफ या योजनेद्वारे, तुम्ही दीर्घ मुदतीसाठी चांगले पैसे कमावू शकता. नियमांनुसार, एखादी व्यक्ती त्याच्या नावावर फक्त एक PPF खातं उघडू शकते. यामध्ये आणि वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. यामध्ये वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करू शकतात. यावेळी या पैशांवर व्याज मिळवू शकता.

लाडक्या बहिणींनो मिळालेले पैसे ‘या’ ठिकाणी गुंतवा; भन्नाट रिटर्न्स मिळतील..

सध्या पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्के आहे. याशिवाय PPF मध्ये 80C अंतर्गत कर लाभ मिळतो. ही गुंतवणूक ई श्रेणीत ठेवण्यात आलीये. म्हणजे तुमची गुंतवणूक, व्याज आणि परिपक्वता रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे