ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

9600 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार..

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेसाठी राज्यभरातून सरकारकडे 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले त्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून अर्ज मंजूर करून 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला.

परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांची अर्ज मंजूर असून सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा महिलांना या योजनेचे पैसे किती मिळणार आणि त्याच प्रमाणे ज्या महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत अशा महिलांचे अर्ज मंजूर कधी होणार यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

ऑक्टोबर महिन्यातील अर्ज कधी मंजूर होणार

महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता या योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 ठेवण्यात आलेली होती या कालावधीमध्ये अनेक महिलांनी ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत परंतु या कालावधीमध्ये केलेल्या अनेक महिलांचे अर्ज मंजूर होणे बाकी आहे या महिलांचे अर्ज कधी मंजूर होणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे यासंदर्भात माहिती मिळाली असता डिसेंबर महिन्यामध्ये अशा सर्व महिलांचे अर्ज मंजूर केली जाणार आहेत.

9600 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार

राज्यातील महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज पण तालुकास्तरीय समितीमार्फत मंजूर करण्यात आला आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता आतापर्यंत मिळालेला नाही अशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून महायुतीचे सरकार स्थापित झाल्यानंतर उर्वरित पाच हप्त्याचे पैसे 7500 रुपये आणि डिसेंबर महिन्यातील वाढीव हप्त्याची रक्कम 2100 मिळून 9600 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

या महिलांना मिळणार 2100 रुपये

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाच हप्त्याचे पैसे 7500 रुपये जमा केलेले आहेत आणि आता सध्या महाराष्ट्र राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या योजनेच्या लाभ वितरण प्रक्रिया ब्रेक देण्यात आलेला आहे अशातच महायुती सरकारकडून महिलांना आश्वासन देण्यात आलेले आहे की राज्यांमध्ये पुन्हा महायुती सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करून 2100 देऊ त्यामुळे महिलांना लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्यात 1500 रुपये ऐवजी 2100 मिळण्याची शक्यता आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे